तुम्ही फॅमिली प्लानिंग करताय? जर याचं उत्तर हो असेल तर तुम्हाला आतापासूनच तुमच्या पिरीयड सायकल, फर्टाइल विंडो, डाएट आणि लाइफस्टाइल हेल्दी बनवण्यासाठी जोर देण्यास सुरुवात केली पाहिजे.
मासिक पाळीवर द्या विशेष लक्ष
मासिक पाळी ही स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण प्रोसेस असते ज्यामुळे तिला मातृत्व प्राप्त होतं. मासिक पाळीत निर्माण झालेली गुंतागुंत अनेक शारीरिक समस्यांना निमंत्रण देऊ शकते. त्यामुळे ज्या महिला फॅमिली प्लानिंगचा विचार करत असतील त्यांनी सर्वात आधी आपल्या पिरीयड सायकलवर विशेष लक्ष दिले पाहिजे. जर तुमची पिरीयड सायकल २५ ते ३५ दिवसांमधील आहे तर ती सामान्य व रेग्यूलर आहे असं मानू शकतो. जर या काळात पिरीयड येत नसतील तर अजिबात दुर्लक्ष करु नका. वेळेत डॉक्टरकडून तपासणी करुन घ्या.
संभोग कधी करावा?
महिलांनी आपली फटाईल विंडो लक्षात ठेवावी कारण या काळात गर्भधारणा होण्याची शक्यता अधिक असते. पिरीयडच्या पाचव्या दिवसा पासून पुढील मासिक पाळी येण्याआधी ११ ते १२ दिवस आधीचा काळ कंसीव म्हणजेच गर्भधारणा करण्यासाठी सर्वात उत्तम काळ मानला जातो. त्यामुळे फटाईल विंडोच्या काळात जास्तीत जास्त संभोग करण्याचा प्रयत्न करा. डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की कित्येक जोडप्यांना हा फॉर्म्युला फॉलो केल्यानंतरही प्रेग्नेंट होण्यासाठी १ वर्षाचा कालावधीही लागतो त्यामुळे लगेचच निराश होऊ नका. प्रयत्न सुरु ठेवा.
डाएटची घ्या खास काळजी
सीव करण्याची इच्छा असणा-या जोडप्यांनी आपल्या डाएटमध्ये कॅल्शियम, लोह, प्रोटीन आणि सर्व प्रकारच्या व्हिटॅमिन असणा-या पदार्थांचा नक्की समावेश करा. फर्टिलिटी वाढवणारे पदार्थ जसं की हिरव्या पालेभाज्या, कोबी, ब्रोकोली, कडधान्य यासारख्या पदार्थांचं सेवन जरुरु करावं. हार्मोन्सचं संतुलन योग्य ठेवण्यासाठी पिवळ्या आणि केशरी रंगाच्या भाज्या देखील खाव्यात. दुधापासून बनणारे पदार्थ जसे की दही, पनीर, लस्सी आणि ड्राय फ्रुट याचाही आपल्या आहारात समावेश करावा. जर तुम्ही मांसाहारी असाल तर मासे आणि अंड हे देखील अवश्य खाऊ शकता.
पाण्याची कमतरता होऊ देऊ नका
शरीरातील पाण्याची कमतरता देखील गर्भधारणेच्या आड येऊ शकते. दिवसभरात तीन ते चार लीटर पाणी जरुरु प्या. पाणी शरीरातील अवयव आणि टिश्यूसना लुब्रिकेटेड ठेवतं आणि हार्मोनल बॅलेंस ठेवायला मदत करतं. पाण्यामुळे महिलांचं गर्भाशय योग्य रितीने काम करु शकतं. यामुळे सर्वाइकल म्यूकस बनतं जे स्पर्मला एग्स पर्यंत पोहचवतं. त्यामुळे दिवसभरात एक एक तासाच्या अंतराने योग्य मात्रेत पाणी जरुर पित राहा